Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साप्ताहिक भविष्य आरोग्याचे ( 28 सप्टेंबर – 4 ऑक्टोबर )

$
0
0

मेष –

गणेशाच्या सल्ल्यानुसार या आठवड्यात तुम्हांला आरोग्यविषयक चिंतेचे कारण नाही. ऋतूमानातील बदलांमुळे व्हायरल इंन्फेक्शनपासून दूर रहा. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम, योगासनं आणि प्राणायम करा.

वृषभ -

मध्यमवयीन आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींना काही जुने विकार पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. येत्या सोमवारी,मंगळवारी अपघाताची शक्यता आहे. तसेच भविष्यात पचनाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे.

मिथून-

तुमच्या राशीतील ग्रहमानाच्या संकेतानुसार ऋतूमानातील बदल तुम्हांला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. व्हायरल तापामुळे तुम्हांला काही दिवस घरीच आराम करावा लागेल. तसेच औषधांकडे दुर्लक्ष करू नका. रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करा.

कर्क -

श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. वेळीच उपचार न घेतल्यास हे लहानसहान आजारदेखील गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने डायटरी सप्लिमेंट्सचा आधार घ्या.

सिंह -

या आठवड्यात तुम्ही त्वचेचे विकार किंवा रक्तातील कमतरतेमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तचाचणी करून डॉक्टरांकडून योग्य निदान आणि औषधोपचार घ्यावेत. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. गंभीरता वाढल्यास ही समस्या दीर्घकाळ  त्रासदायक ठरू शकते.

कन्या -

गणेशाच्या अंदाजानुसार या आठवड्यात तुम्हांला अपघातांचा धोका आहे. काही गंभीर नसले तरीही डॉक्टरांच्या सल्लाकडे तसेच काही दिवस आराम करण्याकडे दुर्लक्ष करू नका. मांड्यांना इजा होण्याची शक्यता अधिक आहे. रक्तदाब आणि हृद्यरोगींनी मात्र मेडिकल चेकअप करून आजार नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.

तूळ -

या आठवड्यात तुम्हांला आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही. काही जुन्या आणि त्रासदायक ठरणार्‍या आजारांवर मात करण्यासाठी काही नवे औषधोपचार फायद्याचे ठरणार आहेत. वाहन चालवताना काळजी घ्या म्हणजे अपघातापासून तुमचा बचाव होण्यास मदत होईल.

वृश्चिक -

काही अनपेक्षित आजार या आठवड्यात उद्भवण्याची शक्यता असल्याने काळजी वाढू शकते. आजरपणामुळे तुम्हांला काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल. मात्र फार काळजीचे काही कारण नाही. मजबूत रोगप्रतिकारशक्तीमुळे तुम्ही आजारपणातून लवकर बरे व्हाल.

धनू -

तुमच्या राशीतील गुरूच्या प्रभावामुळे काही जुने आजार कायमचे नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. शारिरीकरित्या निरोगी राहण्यासाठी नियमित संध्याकाळी चालण्याची सवय लावा.

मकर -

या आठवड्यात सांधेदुखीचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे दुखणे दूर करण्यासाठी पेनकिलरवर अवलंबून राहू नका. मधूमेहींनी खाण्यावर ताबा ठेवावा. इतरांनी आरोग्य गृहीत न घेता व्यायाम, योगसाधना तसेच ध्यानाधारणा करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ  -

अनपेक्षितपणे काही आजारपण उद्भवल्याने चिंता वाढू शकते. यामुळे तुम्हांला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल.त्यामुळे काही लक्षण आढळल्यास त्वरीत उपचार घ्यावेत. मध्यमवयीन लोकांनी आहाराबाबतचे पथ्य पाळावे. तसेच नियमित संध्याकाळी चालण्याची सवय  लावा. यामुळे मन आणि शरीर निरोगी राहण्यास मद्त होते.

मीन -

या आठवड्यात तुम्ही व्हायरल इंफेक्शनमुळे आजारी पडण्याची लक्षण आहेत. तापामुळे तुमची तब्येत नाजूक राहील. त्यामुळे योग्य ट्रीटमेंट घेण्यासाठीन स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या. ‘सेल्फ मेडीटेशन’ टाळा. ग्रहमान आरोग्यविषयक फारसे अनुकूल नसल्याने विशेष काळजी घ्यावी.

GaneshaSpeaks-Logo1

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>