पाणी पिणे आरोग्यासाठी हितकारक असते.पण पाणी किती प्यावे? कमी की जास्त या प्रश्नाचे उत्तर देणे थोडे अवघड असू शकते.कारण जसे पाणी पिणे आरोग्यासाठी हितकारक आहे तसेच अति पाणी पिण्याने काही वेळा शरीरात आरोग्य समस्या देखील निर्माण होऊ शकतात.विषेशत:जर तुम्हाला किडनी विकार असतील तर तुम्ही पाण्याच्या प्रमाणाबाबत दक्षता घेणे खूप गरजेचे आहे.जर तुम्हाला असे वाटत असेल की किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी व शरारीतील टॉक्सिन्स बाहेर टाकून देण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कोमट की थंड पाणी ? निरोगी स्वास्थ्यासाठी कोणता पर्याय निवडाल हा सल्ला देखील नक्की जाणून घ्या.
कलकत्ताच्या आनंदापूर येथील फोर्टीस हॉस्पिटलच्या Consultant Nephrology विभागाचे डॉ.उपाल सेनगुप्ता यांच्यामते जाणून घेऊयात किडनी विकारामध्ये तुम्ही पाण्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे का आवश्यक आहे.
आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शरीराची स्वत:ची एक नियंत्रण प्रणाली असते व तहानेद्वारे ती नियंत्रित केली जाते.Arginine Vasopressin या हॉर्मोन्स द्वारे शरारातील तहानेवर नियंत्रण ठेवण्यात येते.शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की हे हॉर्मोन्स शरीरात निर्माण होते ज्यामुळे मेंदूला तहान लागल्याचा संकेत मिळतो व आपल्याला तहान लागते.सहाजिकच आपल्या शरीरासाठी व किडनीसाठी जास्त अथवा कमी पाणी दोन्हीही हितकारक नसते.या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !
डायरियाचा खूप त्रास झाल्यास डीहायड्रेशनचा त्रास होतो. त्याचा ताण किडनीवरही येतो. पण म्हनून अशावेळेस भरपूर पाणी प्यायल्याने शरीराचे संरक्षण होते असे नाही.त्यामुळे आपल्याला जितकी तहान लागते तितकेच पाणी आपण पिणे गरजेचे असते.जर तुमची किडनी कमजोर असेल आणि त्यात जर तुम्ही भरपूर पाणी प्यायला तर तुमच्या किडनीला टॉक्सिन्स शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी अधिक ताण येतो.यासाठीच किडनी विकार असलेल्या रुग्णांना विनाकारण भरपूर पाणी पिणे टाळा असा सल्ला देण्यात येतो.तसेच यासोबत हे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 10 ‘आरोग्यदायी’ फायदे !जरुर वाचा.
पण किडनी विकारातील पॉलिस्टिक किडनी डिसीज या प्रकारामध्ये दिवसभरात ६ ते ७ लीटर पाणी पिणे हितकारक असते. पाणी कमी पिण्याचा सल्ला तेव्हाच दिला जातो जेव्हा रुग्णाला लघवी बाहेर टाकण्यास समस्या निर्माण होतात.गंभीर किडनी विकाराच्या पहिल्या टप्प्यात पाणी कमी करण्याची काहीच गरज नसते.पण जर काही किडनी विकारांमध्ये रुग्णाला शरीरात पाणी साठल्यामुळे पाय व शरीरावर सूज आली असेल तर मात्र किडनी स्पेशलीस्ट अशा रुग्णाला कमी पाणी पिण्याचा सल्ला देऊ शकतात.पण तुम्ही हेच लक्षात ठेवा की तुमचा मेंदू तुमच्या शरीराला पाण्याची किती गरज आहे हे नियंत्रित करीत असतो. त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवा. जाणून घ्या किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी नियमित किती पाणी प्यावे?
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock