गरोदरपणी एखाद्या स्त्रीला डॉक्टर बेड रेस्ट करण्याचा सल्ला देतात तेव्हा याचा अर्थ निरनिराळा असू शकतो.एखाद्या गरोदर स्त्रीला बेड रेस्ट करताना अंथरुणातून उठण्याची देखील परवानगी नसते तर एखाद्या स्त्रीला फक्त सावधपणे तिची काम करण्याचा सल्ला देण्यात येतो.
सायंटीफिक डायरेक्टर ऑफ गायनेकवर्ल्डचे डॉ.धुरु शाह यांच्याकडून जाणून घेऊयात काही गरोदर स्त्रीयांना गरोदरपणी बेड रेस्ट करण्याचा सल्ला का देण्यात येतो व अशा वेळी गरोदर स्त्रीने नेमके काय करावे अथवा करु नये.जाणून घ्या गरोदर स्त्रियांनी पाठीवर का झोपू नये ?
गरोदर स्त्रीला बेड रेस्ट करण्याचा सल्ला का देण्यात येतो?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वच गरोदर स्त्रीयांना बेड रेस्टचा सल्ला दिला जात नाही.ब-याच जणी गरोदर असताना देखील त्यांची नित्याची कामे सहज करु शकतात.गरोदरपण ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक शारिरिक अवस्था आहे.त्यामुळे सामान्य स्थितीत गरोदर स्त्री प्रसुतीवेदना येई पर्यंत म्हणजेच नऊ महिने होईपर्यंत सक्रिय राहू शकते.मात्र जेव्हा गरोदरपणात बाळाची वाढ योग्य नसणे,योनीमार्गातून रक्तस्त्राव होणे ,उच्च रक्तदाबाचा त्रास असणे किंवा वेळे आधीच प्रसूती होण्याचा धोका असणे अशा काही समस्या निर्माण होतात तेव्हा त्या गरोदर स्त्रीला सक्तीची बेड रेस्ट घ्यावी लागते.आता गरोदर स्त्रियांमधील ‘हाय बीपी’चे निदान वेळीच होणार !
तसेच कधीकधी बाहेर काम करणा-या महिला योग्य आहार व पुरेशी झोप घेत नाहीत.त्यामुळे जर त्यांच्या गर्भाचे योग्य पोषण झाले नाही तर त्या स्त्रीला हाय प्रोटीन डाएट व बेड रेस्टचा सल्ला देण्यात येतो.बेड रेस्टमुळे बाळाला नाळेमार्फत पुरेसा रक्तपुरवठा होतो.ज्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होते.त्यामुळे अंदाजे पाच पैकी एका महिलेला डॉक्टरांकडून बेड रेस्ट करण्याचा सल्ला देण्यात येतो.जाणून घ्या गर्भारपणात कशी घ्याल पुरेशी झोप?
बेड रेस्ट करताना अशा स्त्रीने कोणती कामे करु नयेत ?
जर बाळाची वाढ योग्य नसेल तर अशा स्त्रीला झोपून फक्त वाचणे अथवा टी.व्ही पाहणे एवढेच काम करण्याचा सल्ला देण्यात येतो.कारण या स्थितीतील स्त्री ९० अंशाच्या कोनामध्ये साधे बसू देखील शकत नाही.ती एखादी उशी अथवा आधार घेऊन फक्त २० ते ३० अंशाच्या कोनात डोके वर उचलू शकते.तसेच जर तीला लवकर प्रसुतीवेदना येण्याचा धोका असेल किंवा उच्च रक्तदाब,योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असेल तरी देखील तिला फारच कमी हालचाल करण्यास सांगण्यात येते.अशा वेळी काही गरोदर स्त्रीयांना फक्त घरातल्या घरात चालणे व बाथरुममध्ये जाणे एवढयाच क्रिया करण्याची मुभा असते.घरातील कामे अथवा एखादी जड वस्तू उचलण्यास मुळीच परवानगी नसते.तसेच जर ती गरोदर स्त्री चालू अथवा स्वत: बाथरुममध्ये देखील जाऊ शकत नसेल तर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते.
बेड रेस्ट करीत असलेल्या गरोदर स्त्रीने सेक्स अॅक्टिव्हीटीज अजिबात करु नयेत.मोटरबाईक वरुन प्रवास करणे अथवा खड्यांच्या रस्त्यावरुन प्रवास करणे या गोष्टी तर कोणत्याही गरोदर स्त्रीने मुळीच करु नयेत.बेड रेस्ट करणारी स्त्री अंथरुणात पडूनच दीर्घ श्वास घेणे,पाय वर खाली करणे,मानेचे व्यायाम,पाय व टाचांच्या हालचाली असे व्यायाम मात्र नक्की करु शकते. हे ही जरुर वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?
पुरेशी बेड रेस्ट न घेतल्याचे काय परिणाम होतात ?
बेड रेस्ट करण्याचा सल्ला का देण्यात आला याचे कारण प्रत्येक गरोदर स्त्री साठी निरनिराळे असू शकते.त्यामुळे काही स्थितीत बेड रेस्ट न घेतल्यामुळे कोणतेही विपरित परिणाम होत नाहीत.पण जर बाळाचे वजन ही समस्या असेल व त्या स्त्रीने योग्य आराम नाही घेतला तर मात्र बाळाची योग्य वाढ होत नाही.तसेच जर एखाद्या गरोदर स्त्रीच्या बाळाची जन्मनाळ खाली आली असेल तर आराम न केल्यास तिच्या योनीमार्गातून रक्तस्त्राव होऊ लागतो.तसेच अनेकदा आईने पुरेसा आराम न केल्यामुळे तिला प्रिमॅच्युर डिलीवरीला सामोरे जावे लागू शकते.कारण बेड रेस्ट न केल्यामुळे तिच्या गर्भाशयाच्या मुखावर वजन व दाब येतो.खरेतर प्रसूतीची योग्य वेळ न झालेल्या किंवा जुळी बाळे असणा-या मातेच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ दाब येऊ नये यासाठीच तिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात येतो.
गरोदर स्त्री बेड रेस्ट करताना डिप्रेशन मध्ये जाऊ शकते का ?
खरेतर हे त्या रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असते.एकत्र कुटूंबामधील स्त्रीयांना बेड रेस्ट करणे आवडू शकते कारण त्यांना घरातील कामे करण्याचा ताण येत नाही.अशा स्त्रीया त्यांना जेव्हा गरज लागेल तेव्हाच अथंरुणातून उठतात.त्यामुळे हे सर्वस्वी त्या स्त्रीचे तिच्या घरातील मंडळीसोबत कसे नाते आहे यावर अवलंबून असू शकते.मात्र जर घरातील व कामावरील लोकांनी सहकार्य केले तर अशा स्त्रीला डिप्रेशनच्या त्रासापासून नक्कीच वाचवता येते.जाणून घ्या नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी
बेड रेस्ट करण्यासाठी काही हेल्दी टीप्स-
अशा वेळी तुमचे मन एखाद्या छंदामध्ये अथवा वाचनामध्ये गुंतवा.सुडोकू खेळणे,लेखन करणे,एखादा शॉर्ट-टर्म ऑनलाईन कोर्स करणे,एखादी नवीन भाषा शिकणे,एखादे कोडे सोडवणे अशा गोष्टींमध्ये देखील तुम्ही स्वत:ला गुंतवू शकता.लक्षात ठेवा तुम्ही हे सारे तुमच्या बाळासाठी करीत आहात त्यामुळे चिंता करीत बसण्यापेक्षा या स्थितीमध्ये अधिक आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock