आजकाल कोणतीही आरोग्य समस्या नसताना सर्रास सि-सेक्शन डिलीवरी करण्यात येते आणि याबाबत कोणताही विरोध दर्शवला जात नाही.अनेक तरुण महिला हा त्रास का सहन करुन देखील हॉस्पिटलकडे याबाबत जाब विचारत नाहीत.
सिझेरियन डिलेवरीसाठी निष्कारण केल्या जाणा-या या शस्त्रक्रिये विरोधात सुर्वणा घोष यांनी महिलांच्या हितासाठी हा लढा सुरु केला आहे.प्रसूतीगृहांनी त्यांच्याकडे होणा-या सिझेरीयन डिलीवरीची संख्या जाहीर करण्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका सादर केली आहे(आत्तापर्यंत यामध्ये १.५ लाख महिलांच्या सह्या केल्या आहेत)
त्यांच्या या लढयाला काही डॉक्टर व चिकित्सक यांच्या सोबत महिला व बाल विकासमंत्री मेनका गांधी यांनी समर्थन देत रुग्णालयांच्या या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयातर्फे आवश्यक त्या धोरणांमध्ये फेरबदल करण्याची तयारी दर्शवली आहे.
यासंदर्भात सुर्वणा घोष यांच्याशी त्यांच्या या लढयाबाबत आम्ही चर्चा केली
तुम्हाला हे पाऊल उचलावे असे का वाटले?
माझ्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यांमध्ये कोणतेही कारण नसताना डॉक्टरांनी मला सिझेरीयन करावे लागेल असा सल्ला दिला.यावर मी डॉक्टरांना विचारले की माझी नैसर्गिक डिलीवरी होऊ शकत नाही का? त्यावर त्यांनी मला उत्तर दिले की नैसर्गिक प्रसूती ही खूप त्रासदायक,दमवणारी व वेळकाढू प्रक्रिया आहे.तसेच जर नैसर्गिक प्रसूतीमध्ये काही गडबड झाली तर माता व बाळ दोघांच्याही जीवाला धोका असू शकतो.आणखी एक भीतीदायक घटक म्हणजे नैसर्गिक प्रसूतीमध्ये चिमटा वापरण्याने बाळाच्या मेंदूचे नुकसान होऊ शकते.अशा घाबरवण्या-या गोष्टीमुळे आपण सहज सिझेरीयन प्रसूतीसाठी तयार होतो.बाळाच्या जन्माच्या क्षणी निर्णय घेण्यासाठी लोकांमध्ये असलेले अज्ञान व नैसर्गिक प्रसूती विषयी असलेली अवाजवी भीती याला वाचा फोडण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले.हे जरुर वाचा सिझेरियन प्रसुतीनंतर आठवड्याभरापासून महिनाभर काय त्रास होतो ?
तुमच्या सारखेच इतर काही महिलांचे अनुभव तुमच्या ऐकण्यात आले आहेत का?
माझ्या स्वत:च्या अनुभवाप्रमाणेच मला मदर अॅन्ड बेबी या मासिकाची पत्रकार या नात्याने देखील भारतातील अनेक तरुण महिलांचे प्रसूतीबाबत संवेदनशील अनुभव ऐकायला मिळाले.याच दरम्यान माझा वुमेन्स कलेल्टीव्ह व बर्थ इंडीया यांच्याशी सबंध आला ज्यांचे प्रमुख उद्दिष्ट महिलांना प्रसूती विषयी माहिती देणे व बाळाच्या जन्माच्यावेळी असलेल्या समस्या व धोके टाळण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.त्याचवेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाळाचा जन्म ही प्रक्रिया त्या मातेच्या शरीराच्या स्थितीवर अवलंबून असायला हवी.कारण नैसर्गिक प्रसूती ही स्त्रीच्या हातात असते तर सिझेरीयन प्रसूती करणे डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली करण्यात येते.तर नैसर्गिक प्रसूतीबाबत मातेमध्ये असलेली प्रचंड भीतीमुळे डॉक्टरांना परिस्थिती नियंत्रणात ठेवता येत नाही.यासाठी सुलभ प्रसुतीसाठी ही योगासनं ठरतील अधिक फायदेशीर !
पण सिझेरीयन डिलीवरी विनाकारण झाली आहे हे आपण कसे ओळखावे?
महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सिझेरीयन डिलीवरीच्या विरोधात मुळीच नाही.पण आजकाल सिझेरीयन डिलीवरीचे वाढत असलेले प्रमाण हे नक्कीच एक चिंतेची बाब आहे.मुंबईमध्ये सिझेरीयन डिलीवरीचे प्रमाण २०१० मध्ये १६.७ टक्के होते २०१५ मध्ये त्यात ३२.१ टक्के ही दुप्पट वाढ झाली.याबाबत राज्यानुसार गणना करायची झाल्यास २०१५ ते २०१६ साली सिझेरीयन डिलीवरीची सर्वात जास्त गणना तेलंगणा मध्ये होती जी ५८ टक्के,त्या खालोखाल तामिळनाडू ३४.१ टक्के तर गोव्यामध्ये ही गणना ३१.४ टक्के होती.असे असले तरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्पष्ट केले आहे की या सिझेरीयन डिलीवरीचे प्रमाणाच्या दरात १० टक्के वाढ होण्याचा व प्रसूती दरम्यान व नवजात बाळाच्या मृत्यूच्या दराचा काहीच सबंध नाही.त्यामुळे सहाजिकच ही वाढती संख्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
तुम्ही सादर केलेल्या याचिकेची महिलांना बाळाच्या जन्माच्या वेळी योग्य निर्णय घेताना मदत होईल असे तुम्हाला वाटते का?
ब-याच महिलांना सिझेरीयन डिलीवरीचे धोके माहित नसतात.शस्त्रक्रिये दरम्यान भूल देताना असणारा धोका,रक्त गोठणे,ह्रदय बंद पडणे,मेंदूच्या समस्या असे अनेक धोके त्याक्षणी असू शकतात.त्यामुळे आपण याबाबत चिकित्सक व रुग्णालयाच्या या कृतीबद्दल त्यांना जाब नक्कीच विचारु शकतो.तसेच ही याचिका आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल वर कटाक्ष टाकेल ज्यामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.तसेच याबाबत जागरुकता निर्माण झाल्याने निर्णय घेताना दोन्ही बाजूने विचार करण्यात येईल.
महिला व बाल विकासमंत्री मेनका गांधी यांच्या सहकार्याने जर हॉस्पिटल मधून सिझेरीयन डिलीवरींची संख्या जाहीर करण्यात आली तर अशाने डॉक्टर महिलांना सिझेरीयन न करण्याचा सल्ला देतील का ?
सिझेरीयन डिलीवरी ची संख्या जाहीर झाल्यामुळे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहण्यास मदत होईल.हावर्ड स्टडीनूसार दोन मार्गानी अनावश्यक सिझेरीयन डिलीवरीची संख्या कमी करता घेता येऊ शकते.एक म्हणजे पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक प्रसूतीतंत्र आचरणात आणून व दुसरी म्हणजे सिझेरीयन डिलीवरीची संख्या जाहीर करुन.डॉक्टरांकडे असलेल्या नैसर्गिक प्रसूती व सिझेरीयन प्रसूतीच्या नोंदीवरुन तुम्हाला त्यांच्या बाबत साधारण कल्पना येऊ शकते.अशा सिझेरीयन प्रसूतीच्या जाहीर संख्येवरुन त्या रुग्णालयात डॉक्टर विनाकारण हस्तक्षेप करुन सिझेरीयन करीत असल्यास त्यांना वेळीच प्रतिबंध करता येऊ शकतो.
सिझेरीयन डिलीवरी करणा-या एखाद्या डॉक्टरांच्या बाबतीत तुम्हाला चुकीचे अभिप्राय आले आहेत का?
वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ञांनी अशा काही लोकांच्या व्यवसायाविरुद्ध बंड पुकारले आहे.पण आम्ही सिझेरीयन तंत्राबाबतीत पूर्ण विरोध नक्कीच करणार नाही कारण वैद्यकीय क्षेत्रातील सिझेरीयन विभाग हा दोन जीवांना जीवनदान देणारा व क्लिष्ट समस्येतून वाचवण्यासाठी प्रसंगी आवश्यक असा विभाग आहे.आमचा मुद्दा फक्त या व्यापारीकरणापासून स्त्री व बाळाला संरक्षण इतकाच आहे.जाणून घ्या सिझेरियन प्रसुतीची निवड कोणत्या कारणांमुळे करावी लागते ?
तुम्ही ही चळवळ कुठपर्यंत सुरु ठेवाल?
आम्हाला आशा आहे की या चळवळीमुळे महिलांना नैसर्गिक प्रसूती व सिझेरीयन प्रसूती याबाबत पुरेशी माहिती मिळाल्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेणे सोपे जाईल.तसेच या चळवळीचा व सिझेरीयन ची संख्या जाहीर करण्याचा डॉक्टरांना देखील चांगला फायदा होईल.यामुळे त्यांच्यावरचा महिलांना सिझेरीयन प्रसूती दरम्यान समूपदेशन करण्याचा ताण देखील कमी होईल.कारण अनेक डॉक्टरांच्या मते त्यांना याबाबत सतत विचारणा केली जात असते.महिलांमध्ये नैसर्गिक प्रसूतीचे महत्व व सिझेरीयन प्रसूतीच्या दरम्यान असण्या-या आरोग्य समस्यांबाबत जनजागृती होईल.बाळाला जन्म देणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खूप महत्वाची घटना असते त्यामुळे ती त्रासदायक न होता सुखकर व्हावी हेच आमचे उद्दिष्ट आहे.यासाठी वाचा नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य :Facebook/Change.org