बॉलिवूड फिल्म्स प्रेमींचा आवडता दिग्दर्शक करण जोहर सरोगरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचा बाबा बनला आहे. या जुळ्यांमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे. करणने त्यांची नावं रुही आणि यश ठेवली आहेत. नक्की वाचा : जुळ्या बाळासाठीचे प्रयत्न यशस्वी करतील हे ’6′ पर्याय !
वैदयकीय क्षेत्रातील बदलती तंत्रज्ञान आणि सरोगसीच्या भारतातील नियमावलींनुसार अनेकांची पालक होण्याची इच्छा पूर्ण होत आहे. बॉलिवूडमध्ये शाहरूख खान, आमीर खान, तुषार कपूर पाठोपाठ आता करण जोहरच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून दोन चिमुकले पाहुणे आले आहेत. ‘जुळ्या’ मुलांसाठी प्रयत्न करताना हे ’5′ गैरसमज दूर ठेवा
बाबा होणं ही माझ्या आयुष्यातील मानसिक, शारिरीक दृष्ट्या खूप बदल घडवणारी घटना असल्याचे करणने ट्वीटमध्ये नमूद केले आहे. पण भविष्यात माझ्या काम, प्रवास, सामाजिक कामं यांना थोडं दुय्यम स्थान देऊन माझी मुलं माझी प्राथमिकता राहतील याकडे मी अधिक लक्ष देणार असल्याचे देखील करणने जाहीर केले आहे. (नक्की वाचा : नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड )
— Karan Johar (@karanjohar) March 5, 2017
मुंबई फर्टीलिटी क्लिनिक्स चे डॉ. जतीन शहा यांच्या देखरेखी आणि उपचारांनी हा सरोगसीचा प्रयत्न यशस्वी झाल्याने ट्विटरच्या माध्यमातून करणे त्यांचेही आभार मानले आहेत. रूही आणि यशच्या आगमनानंतर करणवर चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक सिने तारकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. नक्की जाणून घ्या या ’7′ मराठमोळ्या स्टार किड्सची आहेत जरा हटके नावं !
Finally I can say I have a younger brother AND sister!!!!!! So so so happy soo much love to give uff bursting with joy!!!!! https://t.co/HCMkoR5JWL — Alia Bhatt (@aliaa08) March 5, 2017