सेक्सच्या बाबतीत स्त्री व पुरुष या दोघांच्याही गरजा निरनिराळ्या असू शकतात.पुरुषांना सेक्सची क्रिया करण्यापुर्वी थोडा वेळ घेणे आवडते.सहाजिकच त्यामुळे पुरुषांना सेक्सपुर्वी फोरप्ले करुन स्त्रीला प्रभावित करता येते असे वाटत असते.जाणून घ्या या ’7′ कारणांसाठी पुरूषांना आवडतो ओरल सेक्स
मुंबईच्या सायकाट्रीस्ट अॅन्ड सेक्सॉलॉजीस्ट डॉ.संघनायक मेश्राम यांच्यामते सेक्स तीन टप्प्यात करण्यात येतो.फोरप्ले,मेन अॅक्ट आणि आफ्टर प्ले.सेक्स अाधी व सेक्स नंतर करण्यात येणा-या दोन्ही क्रिया स्त्री जोडीदारासाठी प्रेम,जवळीक,जोडीदारा बाबत विश्वास व सेक्सचा खरा आनंद मिळवण्यासाठी खूप महत्वाच्या असतात.पण यासाठी बराच वेळ फोर प्ले करणे गरजेचे असतेच असे नाही.एकत्र ऑर्गेझम मिळवण्याच्या 5 खास टीप्स !
काही संशोधनानूसार सेक्स क्रियेमधील फोर प्ले हा फार महत्वाचा टप्पा असतो.मात्र हे कितीही सत्य असले तरी फक्त फोरप्ले केल्यानेच स्त्री सेक्ससाठी प्रवृत्त होते असे मुळीच नाही.
याचा अर्थ फोरप्ले करु नये का?
या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देणे तसे कठीण आहे.म्हणजे जर तुमची स्त्री जोडीदार आधीच सेक्स करण्यासाठी तयार असेल तर उगाचच फोरप्ले करण्यात वेळ वाया घालवू नका.पण जर ती झोपायच्या तयारीत असेल अथवा कंटाळली असेल तर तिला सेक्ससाठी प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही फोरप्लेचा आधार नक्कीच घेऊ शकता.अशा वेळी तिच्या कानांना चाटणे,स्तनाग्रांना उत्तेजीत करणे या गोष्टींनी तुम्ही तिला नक्कीच सेक्ससाठी उत्तेजीत करु शकता.मात्र अशावेळी तिला नेमके काय केलेले आवडेल हे फक्त तुम्हीच ठरवू शकता.कारण प्रत्येक कपलची ऑर्गेझमचा आनंद घेण्याची पद्धत ही निरनिराळी असू शकते.काही जणांना दोघांनाही एकत्र ऑर्गेझम मिळालेला अधिक आवडतो.त्यामुळे हे सर्वस्वी तुमच्या सेक्सच्या गरजा,इच्छा तुमच्यातील सेक्स करतानाचा रिदम यावर अवलंबून असू शकते.कधीकधी फोरप्लेमुळे यात अधिक चांगल्या प्रकारे भर पडू शकते.लक्षात ठेवा विशेषत: महिलांच्या शारीरिक,मानसिक स्थितीचा व हॉर्मोन्सच्या पातळीचा तिच्या सेक्सच्या इच्छांवर परिणाम होत असतो. ओरल सेक्सचा आनंद घेण्यासाठी खास ’5′ पोझिशन्स नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
तुम्ही फक्त फोरप्ले वर का अवलंबून राहू शकत नाही?
द जर्नल ऑफ सेक्शूल मेडीसीन इन २००९ मध्ये फोरप्लेचे महत्व व फोर प्ले मुळे स्त्रीयांना त्यांच्या जोडीदाराकडून सेक्स करताना मिळणारा आनंद याबाबत संशोधन करण्यात आले. या संशोधनात जवळपास २,३६० महिलांनी त्यांना फोरप्ले पेक्षा इंटरकोर्स दरम्यान एकत्र मिळणारा ऑर्गेझम हा अधिक महत्वाचा असतो असे सांगितले.थोडक्यात महिलांना सेक्समधला खरा आनंद हाच अधिक महत्वाचा असतो.त्यामुळे जर योनीमार्गातील कोरडेपणा,ताण,सेक्सविकार अशा गोष्टींमुळे जर तिला सेक्स करताना आनंद मिळत नसेल तर सेक्स करताना फोरप्ले सेशन कमी वेळ करा व गरज असल्यास याबाबत चांगल्या तज्ञांचा सल्ला घ्या.हे नक्की वाचा पुरूषांनो ! कामक्रिडेदरम्यान या ’7′ चूका टाळाच !
फोरप्ले चा केव्हा उपयोग होत नाही?
फोरप्ले वर फार अवलंबून राहू नका.भावना उत्तेजित करण्याचे ते फक्त एक माध्यम असू शकते.यासाठी तुम्हाला सेक्समधली महत्वाची क्रिया व्यवस्थित करण्यावर भर द्यायला हवा.अति ताण,हॉर्मोनल असतुंलन,काही आरोग्य समस्या असल्यास निराळ्या पद्धतीचा वापर करा.अशा वेळी वैद्यकीय मदतीचा स्त्रीला अधिक चांगला फायदा होऊ शकतो.कामक्रिडा वाढवा या ‘5’ विचित्र मात्र रोचक पर्यायांनी !
संदर्भ-
1: Weiss P, Brody S. Women’s partnered orgasm consistency is associated with greater duration of penile-vaginal intercourse but not of foreplay. J Sex Med. 2009 Jan;6(1):135-41. doi: 10.1111/j.1743-6109.2008.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock