आजकाल भाज्या, फळे विकत घेणे हे एक दिव्यच झाले आहे. कारण अनेक गोष्टी कानावर येतात. उदा. सफरचंद फ्रेश आणि चमकदार दिसण्यासाठी त्यावर मेण लावतात. त्यामुळे आपल्या मनात संघर्ष चालू होतो की नक्की कोणती भाज्या, फळे आरोग्यासाठी योग्य ठरतील. लोकल की इंपोर्टेड? तसंच साधारणपणे भारतीयांचा असा समज असतो की इंपोर्टेड वस्तू (मग अगदी ती कोणतीही असो) ती अधिक चांगली आणि फायदेशीर असते. परंतु, हे काही खरे नाही. आजकाल सफरचंद खरेदी करताना सगळ्यात अधिक गोंधळ उडतो. कारण त्यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. खरंतर इंपोर्टेड अॅपल्स मध्ये खूप विविधता दिसून येते. फुजी अॅपल्स, वॉशिंग्टन, चायनीज अॅपल्स, गाला अॅपल्स अशी न संपणारी यादी फळवाला सांगू लागतो आणि आपण गोंधळात पडतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी सफरचंदाची दोन गटात विभागणी करा-एक म्हणजे लोकल अॅपल्स आणि दुसरे इंपोर्टेड अॅपल्स.
आता यातून काय निवडायचे हा प्रश्न तुमच्या समोर असेल. तर लोकल अॅपल्स (स्थानिक, आपल्या देशात पिकवले जाणारे सफरचंद ) घेणे अधिक उत्तम ठरेल. कारण ते इंपोर्टेड अॅपल्सपेक्षा अधिक चांगल्या प्रतीचे असतात. सौंदर्य आणि आरोग्य सुधारते ‘सफरचंद’ !
Naturopathic nutritionist and author of the book ‘Don’t Just Feed…Nourish Your Child Dhvani Shah यांच्या सल्ल्यानुसार जगाच्या विविध भागातून इंपोर्टेड अॅपल्स आपल्यापर्यंत पोहचतात. परंतू, त्याची लागवड योग्य हंगामात होत नाही, ती अधिक काळ टिकण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. तसेच ती पिकवून बराच वेळ झाल्यानंतर आपल्यापर्यंत पोहचतात. तसंच विमान, ट्रक्स बसेस मधून प्रवास करून सफरचंद बाजारपेठेत पोहचतात. त्यामुळे त्यातील अँटिऑक्सिडेन्ट घटकांचे प्रमाण व चव खालावते.
त्याचबरोबर लोकल अॅपल्सची वाढ होण्यास व ते पिकण्यास पुरेसा वेळ दिल्यामुळे त्यातून अनेक फायदे मिळतात. तसेच पर्यावरणात व वातावरणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीराला ज्या पोषकघटकांची आवश्यकता असते ते पोषकघटक लोकल अॅपल्समधून योग्य प्रमाणात मिळतात.
लोकल अॅपल्स अधिक मऊ, गोड व रसदार असतात. एका लोकल अॅपलचे वजन १८२ ग्रॅम असून त्यात साधारणपणे ५० kcals, १३ ग्रॅम कार्ब्स आणि २.४ ग्रॅम फायबर असतात. तर गाला, फुजी सारखे इंपोर्टेड अॅपल खुसखुशीत, गोड आणि कमी फायदेशीर असतात. त्या एका सफरचंदाचे वजन १५० ग्रॅम असून त्यात सुमारे ७०-८० kcals, २५-३० ग्रॅम कार्ब्स आणि कमी प्रमाणात फायबर्स असतात. असे शहा यांनी सांगितले. जरूर वाचा: मधूमेहींनी लालऐवजी हिरवी सफरचंंद का खावीत ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock