आजकाल प्रोटीन सप्लिमेंट घेण्याचे प्रमाण वाढत आहे.जीममध्ये जाणा-यांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.जीम ट्रेनर तुम्हाला सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात.मात्र अनेक लोकांमध्ये याबाबत अजूनही संभ्रम आढळून येतो.पहील्यांदाच जीममध्ये गेलेल्या व्यक्तीने देखील सप्लीमेंट घेणे आवश्यक असते का? किंवा असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतात.या शंकाचे निरसन करण्यासाठी सप्लिमेंट विषयी ही सविस्तर माहीती जरुर वाचा.
प्रोटीन सप्लीमेंटची नेमकी कोणाला गरज असते?
शरीरासाठी प्रोटीन्स खुप आवश्यक असतात.एक सामान्य व्यक्तीला त्याच्या वजनानूसार एका किलोमागे रोज एक ग्रॅम/तर एका खेळाडूला १.२ ते १.५ ग्रॅ/ बॉडी वेट प्रोटीन ची गरज असू शकते. खेळाडूंमधील हे प्रमाण मात्र त्यांच्या खेळानूसार बदलू शकते.तुमच्या शरीरासाठी आवश्यक प्रोटीन्स तुम्हाला नेहमीच्या आहारातून मिळत नाहीत म्हणून ही प्रोटीन्स सप्लीमेंट घ्यावी लागतात.या सप्लीमेंटचे पचन लवकर होते व ते लवकर शरीरात मिसळले जातात.पावडर,बार,मील रिप्लेसमेंट अशा स्वरुपात ते बाजारात सहज उपलब्ध असतात.तुमच्या ट्रेनर अथवा डायटीशीएन च्या सल्लानूसार तुम्ही ते हेल्थ स्टोअर्स,स्पोर्टस शॉप किंवा ऑनलाईन खरेदी करु शकता. नक्की वाचा टीनएजर्सनी जीममध्ये घाम गाळणे योग्य आहे का ?
प्रोटीन्स सप्लीमेंट नेमकी कोणासाठी असतात-
- ज्यांना रोजच्या आहारातून पुरेसे प्रोटीन्स मिळत नाहीत ते प्रोटीन सप्लीमेॆट घेऊ शकतात.
- जीममध्ये वेट ट्रेनींग करणा-या लोकांना हे घेण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे त्यांच्या स्नायूंमधील नूकसान भरुन निघते.
- वेटलिफ्टींग,बॉडीबिल्डींग करणा-या खेळाडूंना यांचा विशेष फायदा होतो.पण या खेळांडूंना यासोबत इतर पोषणमुल्यांची देखील तितकीच गरज असते.
- जखमी खेळाडूंना त्यांची जखम भरुन निघण्यासाठी प्रोटीन सप्लीमेंट घेण्याचा चांगला फायदा होतो.
प्रोटीन कोणत्या वेळी व किती प्रमाणात घेणे आवश्यक असते?
काम करणा-या लोकांनी त्यांच्या वजनानूसार १.२ ते १.५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रोटीन घ्यावे.आयसीएमआर(ICMR)च्या सल्ल्यानूसार तुमच्या वजनानूसार प्रतिकिलो एक ग्रॅम प्रोटीन तुम्ही घेऊ शकता.तुम्ही दूध,पाणी अथवा ज्यूस यामधून हे प्रोटीन घेऊ शकता.जर तुम्ही कठीण व्यायाम करीत असाल तर तुम्ही दिवसातून तीन वेळा २५ ते ३० ग्रॅम प्रोटीन घ्यायला हवे.यासाठी प्रथम ते सकाळी घ्या,मग तुमच्या व्यायामानंतर अर्धा तासाने पाण्यासोबत प्रोटीन घ्या आणि शेवटी रात्री झोपण्यापुर्वी तुम्ही ते घेऊ शकता. जाणून घ्या जीम बंद झाल्यानंतर घटवलेले वजन पुन्हा वाढते का ?
प्रोटीनची गुणवत्ता-
याचे मुल्यमापन बायोलॉजीकल वैल्यू नूसार ठरविण्यात येते.बायोलॉजीकल वैल्यू ही तुमच्या शरीरात ते किती चांगल्या प्रकारे शोषले जाते यावर ठरु शकते.जर त्याची बायोलॉजीकल वैल्यू अधिक असेल तर सहाजिकच त्यामुळे स्नायू मजबूत होण्याची क्षमता अधिक असे असू शकते.
प्रोटीन चे प्रकार-
यामध्ये तीन प्रकार आहेत.
१.प्रोटीन कॉन्सन्ट्रेट-
हे एक कुठेही सहज उपलब्ध होणारे स्वस्त प्रोटीन आहे.यामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स, मिनरल्स, पाणी आणि २९ते ८९ टक्के प्रोटीन्स असतात.
२.प्रोटीन आयसोलेट-
यामध्ये फॅट्स,कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असतात व तर प्रोटीन ९५ ते ९८ टक्के असतात.अन्न पदार्थांची ही एक कोरडी पावडर असते.
३.प्रोटीन हायड्रोलीसेट-
हे एक प्री- डायजेस्ट प्रोटीन आयसोलेट असते ज्याचा शरीराला जलद फायदा होतो.
बाजारात निरनिराळी प्रोटीन सप्लीमेंट्स उपदब्ध असतात.
१.व्हे प्रोटीन-
जीममध्ये जाणा-यांसाठी अत्यंत उपयोगी असे हे सप्लीमेंट आहे.यामध्ये ९० टक्के प्रोटीन असते.यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन मिळाल्यामुळे शरीरात पुरेशी उर्जा निर्माण होते.यामध्ये Branched Chain Amino Asids अधिक प्रमाणात असतात.यामध्ये Leucine असतात ज्यामुळे मांसपेशीतील नूकसान भरुन निघते.हे प्रोटीम पचनास हलके असते.तसेच हे कॉन्सन्ट्रेट, आयसोलेट आणि हायड्रोलीसेट या तिन्ही प्रकारात ते उपलद्ध असते.
२. सोया प्रोटीन-
हे सोयाबिनपासून बनविण्यात येते.याची चव जरी चांगली नसली तरी ते पाण्यात लवकर विरघळते. यामधील Phytoestrogens मुळे टेस्टोस्टेरॉन ची पातळी कमी होते.तसेच याच्या सेवनामुळे स्त्रीयांच्या शरीरातील एस्ट्रोजीन या सेक्स हॉर्मोन्स मध्ये वाढ होण्यास मदत होते.यामध्ये अर्गीनाइन आणि ग्लूटेमाइन या एमिनो अॅसिड्स ची मात्रा अधिक असते. अर्गीनाइन मुळे Anabolic Growth हॉर्मोन्सला उत्तेजना व ग्लूटेमाइन मुळे स्नायूंमधील बिघाड कमी होतात.सोया प्रोटीन्समध्ये फॅट्स व कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते त्यामुळे हे ह्रदयासाठी उपयोगी असते.सोया प्रोटीन कॉन्सन्ट्रेट ,आयसोलेटेड,सोया पीठ,सोया दूध या प्रकारात उपलद्ध आहे. जाणून घ्या ( नक्की वाचा : जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज ! )
३.कैसियन प्रोटीन-
कैसियन एक कॅलशियम युक्त दूध प्रोटीन आहे.ज्यामुळे स्नायूमधील बिघाड कमी होतात व नवीन मांसपेशी निर्माण करण्यास मदत होते.यामध्ये कैसियन प्रोटीन अधिक प्रमाणात असते.हे एक पचनास जड असे प्रोटीन आहे.यामुळे शरीराला अधिक काळ उर्जा मिळते.रात्री झोपण्यापुर्वी हे घेतल्यास चांगला फायदा होतो.
४.एग प्रोटीन-
अंडे हा एक प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे.हे प्रोटीन पावडर च्या रुपात उपलद्ध असते.याची बायॉलॉजिकल वैल्यू सर्वात अधिक असते.तसेच यामध्ये फॅट्स व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खुप कमी असते.याचे पचन सहज होते त्यामुळे शरीराला हळूहळू उर्जा मिळते.
५.पी प्रोटीन-
हे मटर या भाजी पासून तयार करण्यात येणारे प्रोटीन आहे.यामुळे अॅलर्जी होण्याचा धोका कमी होतो.यामध्ये ब्रांच अमिनो अॅसिडसह सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स असतात.हे पचनास हलके असते.वर्कआऊट नंतर किंवा आधी तुम्ही ते घेऊ शकता.
६.राईस प्रोटीन-
ब्राऊन राईस पासून हे प्रोटीन तयार केले जाते.हे प्रोटीन पचायला इतर प्रोटीनपेक्षा जड असते.तसेच यामध्ये सिस्टीन व मेथियोनाईनची मात्रा अधिक असते.
७.हेम्प प्रोटीन-
हे प्रोटीन हेम्प सीड्स पासून बनवण्यात येते.त्यात अधिक प्रमाणात फायबर,प्रोटीन,ओमेगा फॅटी अॅसिड,मॅग्नेशियम,आर्यन,झिंक आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात.तसेच ते पचनास हलके असते.
ही प्रोटीन्स कोण घेऊ शकते-
१.वेगन व शाकाहारी-
शाकाहारी सोया आणि व्हे प्रोटीन घेऊ शकतात.यामध्ये फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते. त्यांच्यासाठी पी प्रोटीन देखी चांगला पर्याय असू शकतो.वेगन राईस आणि पी प्रोटीन घेऊ शकतात.यात व्हे प्रोटीन इतकेच अमिनो अॅसिड असते.
२.लैक्टोज किंवा ग्लूटेन इंटोलरेंट-
लैक्टोज किंवा इंटोलरेंट प्रमाणेच एखाद्या व्यक्तीला जर दूध पचत नसेल तर त्यांनी व्हे प्रोटीन घ्यावे.कारण यामध्ये कार्बोहायड्रेट असतात.ज्यांना दूधाची अॅलर्जी आहे अशा लोकांना एग प्रोटीन देखील फायद्याचे ठरु शकते.त्याचप्रमाणे तुमच्यासाठी सोया,पी किंवा राईस प्रोटीन घेणे देखील एक चांगला पर्याय असू शकतो.
३.वेळ-
जर तुम्ही अॅथलीट असाल तर तुम्ही दिवसातून कोणत्याही वेळी प्रोटीन घेऊ शकता.प्रोटीन मुळे मसल्स प्रोटीन ब्रेकडाऊन कार्बोहीयड्रेट(MPB)वाढते.त्याचप्रमाणे का कार्बोहीयड्रेट असलेले प्रोटीन घेतल्याने मसल्स प्रोटीन सिंथेसिस(MPS)वाढते.हे दोन्ही वर्कआऊट केल्यानंतर वाढतात.प्री आणि पोस्ट वर्कआऊटमुळे MPB कमी होते तर MPS वाढते.पोस्ट वर्कआऊट साठी व्हे प्रोटीन चांगला पर्याय आहे.हळूहळू पचणा-या या प्रोटीनमुळे रात्रभर MPS अधिक राहते.
४.स्नायू बळकट करण्यासाठी-
स्नायू बळकट करण्यासाठी व्हे प्रोटीन एक चांगला पर्याय आहे.यामुळे वर्कआऊट करताना शरीराला आवश्यक ती ऊर्जा व प्रोटीन मिळते.तुम्ही हे व्यायामा आधी किंवा नंतर कधीही घेऊ शकता.
५.बॉडीबिल्डिंग व हार्डग्रेनर्स-
यांच्यासाठी व्हे प्रोटीन अधिक उपयुक्त आहेत.कारण यामध्ये क्रिएटीन, फायबर, विटामिन, मिनरल्स अधिक प्रमाणात असतात.याचा मसल्स गेन करण्यासाठी चांगला फायदा होतो.वयात येणा-या मुले मसल कमवण्यासाठी ही प्रोटीन घेतात.
ज्या लोकांना खुप मेहनत घेतल्यावर देखील स्नायूंवर विशेष परिणाम जाणवत नाही अशा लोकांना हार्डग्रेनर्स म्हणतात.त्यांना वर्कआऊट बरोबर खाणे देखील गरज असते.वेट गेनर सप्लीमेंटमध्ये कॉर्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात.मात्र त्यांना यासोबत प्रोटीनची देखील गरज असते.यासाठी त्यांनी व्हे,कैसियन किंवा एग प्रोटीन घ्यावे
६.तुमच्या बजेटनूसार-
व्हे प्रोटीन वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असले तरी ते महाग आहे.मात्र जर तुमचे बजेट व्यवस्थित असेल तर तुम्ही मिश्र प्रोटीन सप्लीमेंट घेऊ शकता.हे तीन प्रकारात उपलद्ध असते.सोया प्रोटीन देखील अनेक प्रकारात उपलद्ध असून त्यांची किंमत वेगवेगळी असते.
७.मील रिप्लेसमेंटसाठी-
दर तीन तासांनी खाल्याने तुमच्या शरीराला फॅट बर्न करण्यासाठी सहकार्य मिळते.शरीरात पुरेसे अन्न असल्यास रक्तातील साखर देखील नियंत्रित राहते.ंयामुळे स्नायू मजबूत राहतात व शरीराला पुरेशी उर्जा मिळते.
यासाठी जर दिवसभरात सहा वेळा खाणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घेऊ शकता.तुम्ही घेतलेल्या प्रोटीनमध्ये साखर,कार्बोहायड्रेट आणि शरीराला आवश्यक फॅटी अॅसिड्स असतात.ज्यामुळे तुमच्या शरीराला कमी कॅलरीज मध्ये देखील जास्त प्रोटीन्स मिळतात.मात्र याचा दिर्घकाळ उपयोग केल्यास कधीकधी पचनाचे विकार होण्याची शक्यता असते.
८.मधूमेहींसाठी-
मधूमेही झीरो शूगर आणि कार्बोहायड्रेट असलेले प्रोटीन घेऊ शकतात.यासाठी ओबीक्यूर(Obicure)प्रोडक्टस देखील ते वापरु शकतात.ज्यामध्ये हाय प्रोटीन,फायबर व कमी कॅलरीज आणि फॅट्स असतात.यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घेणे आवश्यक आहे.
९.महिलांसाठी-
महीला व्हे प्रोटीन घेऊ शकतात.यासोबत प्री आणि पोस्ट मेनोपॉजसाठी त्यांनी सोया प्रोटीन घेणे चांंगला पर्याय ठरु शकतो.कारण यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन्स असतात.
१०.व्यस्त जीवनशैली असणा-यांसाठी-
जर तुम्ही खुप व्यस्त असाल आणि तुम्हाला दूधामध्ये प्रोटीन मिसळून घ्यायला देखील वेळ मिळत नसेल तर तुम्ही रेडी टू ड्रींक प्रोटीन शेक घेऊ शकता.यामध्ये हाय प्रोटीन आणि कमी कार्बोहायड्रेट आणि काही आवश्यक फॅटी अॅसिड्स असतात.यामुळे तुमचे पोट भरते ज्यामुळे तुम्ही बाहेरचे पदार्थ कमी खाता.
प्रोटीनचे दुष्परिणाम-
- तरुणमुलांमध्ये तज्ञांच्या सल्लाशिवाय प्रोटीनच्या आहारी गेल्यामुळे काही दुष्परिणाम आढळून आले आहेत
- प्रोटीन्सचा तज्ञांच्या सल्ल्याशिवाय वारंवार वापर केल्यास किडनी आणि इतर अवयवांवर दुष्परिणाम होतो.
- यकृताच्या कार्यात अडथळा होऊ शकतो.
- व्हे प्रोटीन मुळे किडनी स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते.
- बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
- प्रोटीनच्या सेवनामुळे पोषण कमी होऊन वजन वाढू शकते.
. Kanda A, Nakayama K, Fukasawa T, Koga J, Kanegae M, Kawanaka K, Higuchi M. Post-exercise whey protein hydrolysate supplementation induces a greater increase in muscle protein synthesis than its constituent amino acid content. Br J Nutr. 2013 Sep 28;110(6):981-7. doi: 10.1017/S0007114512006174. Epub 2013 Feb 7. PubMed PMID: 23388415.
2. van Vliet S, Burd NA, van Loon LJ. The Skeletal Muscle Anabolic Response to Plant- versus Animal-Based Protein Consumption. J Nutr. 2015 Sep;145(9):1981-91. doi: 10.3945/jn.114.204305. Epub 2015 Jul 29. Review. PubMed PMID: 26224750.
3. Volek JS, Volk BM, Gómez AL, Kunces LJ, Kupchak BR, Freidenreich DJ, Aristizabal JC, Saenz C, Dunn-Lewis C, Ballard KD, Quann EE, Kawiecki DL, Flanagan SD, Comstock BA, Fragala MS, Earp JE, Fernandez ML, Bruno RS, Ptolemy AS, Kellogg MD, Maresh CM, Kraemer WJ. Whey protein supplementation during resistance training augments lean body mass. J Am Coll Nutr. 2013;32(2):122-35. doi: 10.1080/07315724.2013.793580. PubMed PMID: 24015719.
4. Tang JE, Moore DR, Kujbida GW, Tarnopolsky MA, Phillips SM. Ingestion of whey hydrolysate, casein, or soy protein isolate: effects on mixed muscle protein synthesis at rest and following resistance exercise in young men. J Appl Physiol (1985). 2009 Sep;107(3):987-92. doi: 10.1152/japplphysiol.00076.2009. Epub 2009 Jul 9. PubMed PMID: 19589961.
5. Kurzer MS. Hormonal effects of soy in premenopausal women and men. J Nutr. 2002 Mar;132(3):570S-573S. Review. PubMed PMID: 11880595.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock