Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

वॅक्सिंगनंतर त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी खास टीप्स !

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

       छायाचित्र सौजन्य –Shutterstock

शरीरावर वाढणारे अनावश्यक केस काढण्यासाठी अनेकजणी वॅक्सिंगचा पर्याय निवडतात. हा थोडा वेदनादायी असला तरीही सुरक्षित पर्याय आहे. मात्र काहीजणींना वॅक्सिंगनंतर त्वचेवर लालसरपणा वाढणे, खाज येणे, सूज येणे अशा समस्या आढळतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी सखिया स्किन क्लिनिकच्या डरमॅटोलॉजिस्ट डॉ. रिद्धी चव्हाण यांनी सुचवलेल्या या टीप्स तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरतील. ( नक्की वाचा : अनावश्यक केस काढण्याच्या विविध उपचारपद्धतींचेही आहेत दुष्परिणाम !)

वॅक्सिंगनंतर जळजळणारी त्वचा थंड कशी कराल ?

  • वॅक्सनंतर त्वचेवर खूपवेळ जळजळ किंवा लालसरपणा आढळत असेल तर त्याठिकाणी कोल्ड कॉम्प्रेस ठेवा. कोल्ड कॉम्प्रेसमुळे दाह, जळजळ आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते.
  • त्वचेमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी लव्हेंडर ऑईल किंवा टी ट्री ऑईलचा वापर करा. काकडी आणि कोरफडचा गर यांचा त्वचेवर हलका थर लावल्यास लालसरपणा आणि पुरळ कमी करण्यास मदत होते.
  • अर्धा कप कच्च्या दूधामध्ये अर्धा कप पाणी मिसळा. त्यामध्ये टॉवेल बुडवा. तो बाहेर काढून त्वचेवर ठेवा.दूधातील लॅक्टीक अ‍ॅसिड दाह कमी करण्यास मदत करते.
  • वॅक्स केल्यानंतर त्वचेवर पुरळ येत असल्यास त्यावर cortisone cream  लावा. यामुळे लालसरपणा कमी करण्यासाठी मदत होते.

( नक्की वाचा : सेक्स करण्यापूर्वी मुलींनी योनीमार्गाजवळील केस काढावेत का ?)

कोणती काळजी घ्याल  ?

वॅक्स केल्यानंतर सैलसर कपडे घाला. तसेच शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा. त्यामुळे त्वचा मोकळी राहण्यास  मदत होते. सिंथेटीक कापडामुळे त्वचेवर जळजळ, खाज येण्याचे प्रमाण वाढते. तसेच वॅक्सिंग नंतर सतत त्वचेला हात लावणे टाळा.

  • वॅक्स केल्यानंतर शक्यतो किमान 24 तास थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळा.
  • वॅक्स केल्यानंतर त्वचेवर पुढील 24 तासादरम्यान शॉवर जेल किंवा लोशन लावणे टाळा.
  • वॅक्सिंगदरम्यान त्वचेवरील पहिला थर निघतो. त्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. त्यामुळे पुढील 2-3 दिवस वाफ घेणे, सॉना टाळा. तसेच आंघोळीचे पाणी कडकडीत गरम घेण्याऐवजी थोडे कोमटच निवडा. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होईल.

वॅक्सिंगनंतर तीन दिवसांहून अधिक वेळ लाल पुरळ त्वचेवर त्रासदायक ठरल्यास त्यांनाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचे उपचार घ्यावेत. प्युबिक एरियावरील केस काढण्यासाठी हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर करावा का ? हेदेखील नक्की जाणून घ्या.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles