गेल्यावर्षीपासून 21 जून हा दिवस जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. यंदाचा योगादिवसही प्रचंड उत्साहाने जगभरात साजरा केला गेला. योगा ही प्राचीन विद्या असून अनेक आजारांवर मात करण्यासाठी एक प्रभावी उपचारपद्धती आहे. औषधोपचारांसोबत त्याचा वापर योग्य प्रकारे केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतात.
मन की बात या आकाशवाणीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांशी संवाद साधतात. आजही त्यांनी विविध घडामोडींबाबत माहिती देताना गेल्या आठवड्यात साजरा करण्यात आलेल्या योगादिनाबाबत नागरिकांचे आभार मानले. तसेच जगभरात झपाट्याने वाढणार्या मधूमेहाच्या धोक्याला आटोक्यात ठेवण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच यापूर्वी मधूमेहाचे निदान झालेल्यांनी योगाअभ्यास अवश्य करा आणि त्यातून दिसणारा सकारात्मक बदल कळवा असे आवाहनही केले आहे. #YogaFightsDiabetes हा हॅशटॅग वापरून तुमचा अनुभव सांगा असे आवाहन त्यांनी केले आहे. घरगुती उपायांबरोबरच तुम्ही ही योगासने करूनही मधुमेहावर नियंत्रण करू शकता. तसेच मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
येत्या दशकातच मधूमेहाच्या रुग्णांमध्ये दुपट्टीने वाढ होण्याची शक्यता आहे. मधूमेहातूनच हृद्यरोग, किडनीचे विकार, कमजोर दृष्टी असे त्रास वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच तुमच्या तणावग्रस्त जीवन शैलीतूनही थोडा वेळ स्वास्थ्य सुधारण्यासाठी काढा आणि नियमित किमान घरच्या घरी योगाअभ्यास करा. मधूमेहातून पूर्णपणे सुटका होणं शक्य नसले तरीही रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. रजपूत सिंग या मधूमेहीने केवळ योगाअभ्यासाच्या मदतीने त्रासदायक इन्सुलिनच्या इंजेक्शन पासून सुटका मिळवली. त्यांची ही सत्यकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आणि ती प्रेरणा घेऊन नक्कीच आजपासून योगा करायला सुरवात करा. आणि तुमचा अनुभव सोशल मिडीयावर #YogaFightsDiabetes या हॅशटॅग सोबत शेअर करायला विसरू नका.
Image source – Ians