Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock
Read this in English
आजकाल घरगुती पार्टी असो लग्न असो किंवा हॉटेलामधील ट्रीट…. आधी स्टार्टर त्यानंतर मेन कोर्स आणि पुढे डेझर्ट असा खाण्याचा क्रम असतो. अनेकांसाठी स्टार्टरशिवाय खाण्याला, पार्टीला काही मजाच नाही असा समज असतो. पण वेट लॉसच्या मिशनवर असणार्या अनेकांसाठी अशावेळी मोह आवरणं कठीण होऊन बसते. पण चीट डे दिवशी खानपानाची बंधन थोडी बाजूला सारून आवडत्या गोष्टींवर ताव मारण्याची मुभा असते. नंतर तुम्ही थोडी अधिक मेहनत करून वाढलेल्या कॅलरीज बर्न करू शकता.
स्टार्टर्स हे प्रामुख्याने तळलेले असतात त्यामुळे शरीरात फॅट्स आणि कॅलरीज वाढण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच कोणत्या स्टार्टरच्या पदार्थामधून किती कॅलरीज मिळतात हे जाणून घ्या आणि त्यानुसार कशाचा किती आस्वाद घ्यावा.
शाकाहारी स्टार्टर्स आणि त्यामधून मिळणार्या कॅलरीज – :
- तंदूरी मशरूम: 1 पीस = 11.7 cal
- हरा कबाब : 1 पीस = 29.6 cal
- मशरूम टिक्का : 1पीस = 33.6 cal
- पनीर टिक्का : 1 पीस = 40.8 cal
- तंदूरी आलू : 1 पीस = 45.2 cal
- आलू टिक्की : 1 पीस = 160.5 cal
- स्टफ आलू : 1 पीस = 183.9 cal
- व्हेजिटेबल सिख कबाब : 1 पीस = 214.8 cal
मांसाहारी स्टार्टर्स आणि त्यामधून मिळणार्या कॅलरीज -:
- फिश टिक्का : 1 पीस = 71.1 cal
- सिख कबाब : 1 पीस = 87.4 cal
- चिकन कबाब : 1 पीस = 103.5 cal
- तंगडी कबाब : 1 पीस = 118.9 cal
- मटण सीख रोल : 1 पीस = 161.9 cal
- तंदूरी चिकन : 1 पीस= 238.1 cal
भाज्यांना, मांसाहाराला योग्य मसाले आणि पुरेसे शिजवल्यास अस्सल भारतीय पदार्थांचा आस्वाद घेणे आरोग्यदायीदेखील ठरेल. स्टार्टर्सची निवड स्मार्टली केली तर तुम्हांला नक्कीच आवडीनिवडीवर मुरड न घालता त्याचा जेवणासारखा आस्वाद घेता येईल. मग या टीप्सने तुमचे स्टार्टर्सची निवड हेल्दी आणि टेस्टीदेखील होईल.
मग पहा फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण अधिक न वाढवता कसा घ्याल स्टाटर्सचा आस्वाद ?
- स्टार्टर्सच्या सोबत भरपूर भाज्या ठेवा. प्रामुख्याने फायबरयुक्त भाज्या खाल्ल्यास त्यामधून शरीराला आवश्यक पोषणद्रव्यदेखील मिळतील.
- कबाब सारखे मीट बेस्ड पदार्थ निवडा. यामध्ये लीन मीट, मॅरिनेट केलेले ताजे मसाले आणि दही वापरा.
- चणे, डाळी यांच्या वापर करून तयार केलेले स्टार्टर्स निवडा. यामध्ये फायबर आणि प्रोटीन घटक मुबलक असतात. यामुळे अनावश्यक फॅट्स आणि कॅलरीज वाढणार नाहीत.
- तुमच्या पसंती आणि प्राधान्यानुसार स्टार्टर्स बनवण्याची विनंति करा. स्टार्टर्समध्ये एखादा अनहेल्दी पदार्थ असेल तर त्याचा वापर टाळायला सांगा.
- वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर स्टार्टर्सची निवड जरा स्मार्टली करा. वाफवलेले किंंवा ग्रील स्टार्टर्स निवडा. यामुळे पोटाजवळील चरबी वाढणार नाही.
These calories are counted using HealthifyMe calorie counter, world’s first Indian nutrition tracker.