Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

काविळीच्या या ’8′लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –Shutterstock

पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आहेत.या दिवसात दुषित पाण्याचा पुरवठा किंवा खाण्यात -पिण्यात येण्याचा धोका दाट असतो. त्यामुळे उघड्यावरचे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. दुषित पाण्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो याप्रमाणेच काविळ होण्याची शक्यतादेखील अधिक असते. हिपिटायटीस ए च्या विषाणूचा दूषित पाण्यामधून प्रसार होते त्यामुळे यकृताचे नुकसान होते. म्हणूनच काविळीच्या या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या.

  • त्वचा ,डोळे पिवळे होणे -

काविळ जसजशी शरीरात पसरत जाते तसतसे डोळे आणि त्वचा पिवळी होण्याचे प्रमाण वाढते. शरीरात बिलिरूबीनचे प्रमाण वाढते व यकृतातील लाल रक्तपेशींचे नुकसान होते. परिणामी  त्वचा हळूहळू पिवळी होण्याचे प्रमाण वाढते.

  • मूत्राचा रंग अधिक पिवळा होतो -

शरीरातील लाल रक्त पेशींचे रुपांतर बिलिरूबीनमध्ये होते त्यानंतर बाईलमध्ये त्याचे रुपांतर होते.ते मूत्राच्या मार्गाने शरीराबाहेर पडते.  मात्र काविळीमध्ये या बिलीरूबीनचे प्रमाण वाढते. परिणामी मूत्राचा रंग बदलून तो अधिक गडद होतो.

  • शौचाचा रंग हलका होणे -

निरोगी लोकांमध्ये बिलीरूबिनचे प्रमाण योग्य असल्याने त्याच्या शौचातून पुरेशा प्रमाणात बाईल बाहेर पडते. मात्र काविळीच्या त्रासामध्ये मूत्रमार्गातून अधिक प्रमाणात बिलीरुबीन बाहेर पडते. उर्वरित रक्तप्रवाहाच्या माध्यमातून शरीरात इतरत्र विविध टीश्यूंवर साचते. त्यामुळे शौचाचा रंग राखाडी रंगाचा अधिक दिसतो.

  • पोटदुखी -

शरीरातील बिलरूबिन किंवा बाईलच्या कमतरतेमुळे काविळ होऊ शकते. तसेच यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने पित्ताशयाचे खडे होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. यामध्ये प्रामुख्याने उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली पोटदुखी होते.

  • अति थकवा -

काविळीच्या त्रासामध्ये थकवादेखील अतिप्रमाणात जाणवतो.

  • उलट्या -

वेळीच उपचार न केल्यास उलट्या आणि मळमळ हा त्रास अधिकप्रमाणात जाणवू शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.

  • खाज येणे -

काविळीचा त्रास होणार्‍यांमध्ये खाज येण्याची समस्या अधिक आढळते. सुरवातीला हाताला त्यानंतर पायांना खाज येते. हळूहळू रात्रीच्या वेळेस हा त्रास अधिक वाढू शकतो.

  • झोपमोड होणे -

झोप  कमी होणे सोबतीला मानसिक त्रास वाढणे ही लक्षण काविळीच्या त्रासामध्ये आढळतात.

वेदनारहित वाढणारी काविळ :

काविळीमध्ये पोटदुखीचा त्रास होत नसल्यास कदाचित पित्ताशयाच्या नलिकेमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे संकेत देतात. त्यामुळे यामध्ये पिवळसर त्वचेसोबत वजन कमी होणे, पातळ शौचाला होणे अशी लक्षण दिसून येतात.  

संदर्भ

  • Biliary Disease Clinical Presentation (http://emedicine.medscape.com/)
  • Jaundice (http://www.medicinenet.com/)


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>