Read this in English
Translated by Sushantdeep Sagvekar
रमजान महिना धार्मिकदृष्ट्या जितका पवित्र असतो तितकीच या दिवसात खाण्याची चंगळ असते. रस्त्याच्या कडेला सायंकाळी अनेक पक्वान्नांचा सुवास दरवळत असतो. यापैकी अनेकांना मोह असतो तो म्हणजे लखनवी बिर्याणीचा. मसालेदार आणि मांसाहारींच्या हमखास आवडत्या पदार्थांपैकी लखनवी मटण बिर्याणीचा आस्वाद घरच्या घरी घेण्यासाठी नक्की करून पहा ही टेस्टी लखनवी मटण बिर्याणी.
साहित्य:
गरम मसाल्याकरिता साहित्य:
- १ दालचीनीचा तुकडा
- ८-१० लवंंग
- २-३ टेबल स्पुन जिरे
- १ टेबल स्पुन बडीशेप
- २-३ टेबल स्पुन धने
- १ टेबल स्पुन काळी मिरी दाणे
- २ चक्रीफुल
- २-३ जायपत्री
- २-३ मसाला वेलची
- ३-४ वेलची
हे नक्की वाचा मसाल्यांनीबनवा’सेक्सलाईफ’ अजुनथोडे’स्पाइसी’
मटण मेरिनेशनकरिता साहित्य:
- १/२ किलो मटन
- २-३ टेबल स्पुन आले लसुण पेस्ट
- १ टेबल स्पुन हळद
- १ टेबल स्पुन मिरची पावडर
- काजु पेस्ट
- चिमुटभर गरम मसाला
- ४-५ टेबल स्पुन दही
शिजविण्यासाठी:
- २-३ टेबल स्पुन मीठ
- ३ टेबल स्पुन तुप
- २-३ टेबल स्पुन तेल
- २-३ कप दुध
- केशर
गरम मसाल्याची कृती:
- गरम मसाल्याचे पदार्थ भाजुन घ्या.
- भाजुन झाल्यावर मसाले मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
मटण मेरिनेशनची कृती:
- अर्धा किलो मटणांंमध्ये आले-लसुण पेस्ट, हळद, मसाला, काजुची पेस्ट, गरम मसाला आणि दही मिक्स करुन मेरिनेट करा.
- मेरिनेटेड मटण एक तास फ्रिजमध्ये ठेवा.
कृती:
- मेरिनेटेड मटण फ्रिजमधुन काढुन रुम टेंंपरेचरवर येउ द्या. मटणामध्ये मीठ मिसळा.
- कढईत तेल आणि तुपाची फोडणी देउन मेरिनेटेड मटण घाला.
- मिश्रण ढवळुन काही मिनिटे मटण शिजु द्या.
- मिश्रणावर झाकण ठेवुन अर्धा तास शिजु द्या.
- भातावर मटणाचा थर द्या आणि त्यात थोडे केशर दुधही मिसळा.
- त्यात थोडे मीठ, गरम मसाला, तळलेला कांंदा आणि तुप मिसळा.
- कढईवर घट्ट झाकण ठेवा. मिश्रण मंंद आचेवर ठेवा.
- मिश्रण अर्धा तास शिजु द्या आणि थोडे थंंड करुन मटण बिर्याणीचा आस्वाद घ्या.
Weight Loss च्यामिशनवरअसणार्यांच्याआहारातहीकाअसावाभात, हेनक्कीजाणूनघ्या
छायाचित्र स्त्रोत: Shutterstock