छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
सेक्स करण्याचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. परंतू खूप दिवस सेक्स न केल्यास योनीमार्गात काही बदल होतो का? हा प्रश्न स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांच्या मनातदेखील नक्की डोकावतो. परंतू त्याचे थेट उत्तर जाणून घेण्यापूर्वी योनीमार्गाविषयी काही रोचक माहिती नक्की जाणून घ्या. योनीमार्गातील स्नायू हे नैसर्गिकरित्या लवचिक असतात. त्यामुळे ताण आल्याने त्यामधील लवचिकता कमी होत नाही. स्त्रियांमधील हायमेन हा नाजूक पडदा फाटल्यानंतर योनिमार्ग सेक्सदरम्यान पूर्ण पणे खुला होतो. तसेच सेक्सनंतर तो पुन्हा पूर्ववत होतो. सेक्स गाईड – कसा घ्यावा महिलांनी पहिल्यांदा सेक्स करताना आनंद
सेक्सश्युअल हेल्थ थेरपीस्ट आणि फिजिशियन डॉ. विजयसारथी रामनाथन यांच्यामते, सतत दोन वर्ष सेक्स केल्यास योनिमार्ग ढिला होतो. मात्र हे काळजीचे कारण नाही.
- सेक्स आणि योनिमार्ग
दोन वर्ष सतत सेक्स केल्यानंतर योनिमार्ग थोडा ढिला होण्याची शक्यता असते. मात्र काही व्यायामाने योनीमार्गातील स्नायू मजबूत ठेवणे शक्य आहे. याकरिता किगल एक्सरसाईज केले जातात. या व्यायामामुळे काही प्रमाणात फायदा होतो. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते त्यामुळे योनीमार्ग आणि त्याचे आरोग्यदेखील व्यक्तीपरत्वे वेगळे असतात. त्यामुळे किती प्रमाणात व्यायाम केल्यास योनीमार्ग घट्ट राहील हे व्यक्तीनुसार बदलते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला विविध प्रमाणात व्यायाम करणे गरजेचे आहे.
सेक्सदरम्यान पेनिट्रेशनच्या वेळेस त्रास होत असल्यास त्यामागे दोन कारण असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे व्हर्जायनल ल्युब्रिकंटची कमतरता आणि दुसरे म्हणजे सेक्सची भीती. ल्युब्रिकंटची कमतरता असल्यास सेक्स करताना वेदना होतात. तर भीती वाटत असल्यास संभोग / पेनिट्रेशन करणे कठीण होते. त्यामुळे सेक्स अनेक दिवस न केल्यास योनीमार्ग आकुंचित पावल्यासारखे वाटते. त्यामुळे थेट सेक्सचा आनंद घेता कामक्रिडेचादेखील आनंद घेऊन हळूहळू वातावरण निर्मिती करा. तसेच सेक्सदरम्यान होणारा त्रास टाळण्यासाठी मनातील भीती दूर करा सोबतच ल्युबरिकंटची योग्य निवड करा.
सेक्सपासून दूर असताना जर स्त्रिया हस्तमैथूनाचा आनंद घेत नसतील तर त्यांच्यामध्ये योनीमार्गाच्या शुष्कतेची समस्या अधिक आढळते.तसेच त्याचा परिणाम सेक्सलाईफवर दिसतो.
Reference
Seal, B. N., & Meston, C. M. (2007). ORIGINAL RESEARCH—WOMEN’S SEXUAL HEALTH: The Impact of Body Awareness on Sexual Arousal in Women with Sexual Dysfunction. The journal of sexual medicine, 4(4i), 990-1000.