Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हेल्मेट, टोपीचा वापर पुरूषांमध्ये केसगळती वाढवते का ?

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र काही जण स्टाईलच्या नादात, वेळेच्या अभावी किंवा निष्काळजीपणामुळे हेल्मेट घालणे टाळतात. हेल्मेटच्या वापरामुळे केसगळती होते असादेखील काहींचा समज आहे. परंतू हा केवळ गैरसमज आहे. केसगळती वाढण्यामागे तसेच टक्कल  पडण्याचा धोका ओळखण्यासाठी या लक्षणांकडे सजगतेने पहा. दीर्घकाळ हेल्मेट, हेड गियर, टोपी किंवा हॅट वापरण्याचा आणि केसगळती वाढण्याचा काहीच थेट संबंध नाही. असे डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे.

हेल्मेट किंवा हेड गियर वापरल्यामुळे टाळूजवळ घुसमट होते. त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी केसगळतीची समस्या वाढते असा काहींचा समज आहे. मात्र वास्तवात हेअर फॉलिसेल्स  हवेतून मिळणार्‍या ऑक्सिजनवर अवलंबून नसतात. केसगळती रोखण्यासाठी टाळा या ’7′ चुका !

हेअर फॉलिसेल्सना ऑक्सिजनचा पुरवठा रक्ताद्वारे होतो. जसे केस खूप घट्ट बांधल्यास किंवा विशिष्ट प्रकारच्या हेअर स्टाईलमुळे केसांचे नुकसान होते. तसेच पुरूषांमध्ये खूप घट्ट स्वरूपात घातलेल्या हेल्मेटमुळे रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. परिणामी केसगळतीची समस्या वाढते.  वापरत असलेली हॅट, टोपी किंवा हेल्मेट अस्वच्छ राहिल्यास टाळूला संसर्ग होऊ शकतो. त्याचा परिणाम केसगळती हा असतो. त्यामुळे केवळ स्टाईलचा भाग म्हणून न पाहता वापरत असलेली हेल्मेट्स, टोपी, स्कार्फ हे स्वच्छ ठेवा. अन्यथा केसगळतीचा त्रास वाढून टक्कलपणाचा त्रास उद्भवू शकतो.

हेल्मेट्स किंवा हेड गिअर वापरताना कोणती काळजी घ्यावी ? 

  • हेल्मेट घालताना आणि काढताना काळजी घ्या. धसमुसळेपणा करू नका.  फार जोरात हेल्मेट काढल्यास केसांचे नुकसान होऊ शकते. यामुळे पातळ केस असणार्‍यांमध्ये केसगळती वाढू शकते.
  • अस्वच्छ टोपी, हेल्मेट्स यांमुळे केसगळती वाढू शकते. त्यामुळे हेल्मेट वापरण्यापूर्वी डोक्यावर स्वच्छ सुती कापड बांधा. यामुळे केसांचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होईल.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles