छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
मेष -: या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. काही शारिरीक समस्या तुम्हांला अनपेक्षितरित्या त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच त्यामधून पटकन बाहेर पडणे कठीण आहे. त्यामुळे काही दिवस हा त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
वृषभ-: काही जुने आजार/व्याधी असलेल्यांव्यतिरिक्त इतरांसाठी हा आठवडा आरोग्यदायी आहे. मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांना या आठवड्यात अर्थ्राईटीसच्या त्रासापासून दूर राहण्याची गरज आहे. फिजिशियनच्या सल्ल्याने आहारात पुरेशा डाएटरी सप्लिमेंट्सचा समावेश करा.शारिरीक कष्ट, व्यायाम आणि लॉंग़ वॉक यामुळे स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत होईल.
मिथून – : राशीचे ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. यामुळे शारिरीक त्रास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात आरोग्याची पुरेशी काळजी घ्या. लहानसहान समस्यांकडेदेखील या आठवड्यात दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार सुरू करा म्हणजे गंभीरता वाढणार नाही.
कर्क -: या आठवड्यात आरोग्यविषयक चिंता वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पचनाच्या विकारांकडे लक्ष दया.तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अपघाताची शक्यता असल्याने वाहनं जपून चालवा. तसेच फिजिकल अॅक्टीव्हीटीदेखील जपूनच करा.
सिंह – : हा आठवडा फारसा आरोग्यदायी नाही. लहानसहान समस्यांदेखील वेळीच उपचारांनी नियंत्रणात ठेवा. मध्यमवयीन आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांनी नियमित व्यायाम, चालण्याचा सराव करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा फीटनेस वाढेल.
तूळ- : आरोग्याच्या दृष्टीने नव्या समस्या उद्भवण्याची शक्यता या आठवड्यात नाही. काही जुने त्रास वाढले असल्यास काळजी घ्या. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी वेदना कमी करण्यासाठी योग्य उपचार सुरू करा. मधूमेह,रक्तदाबाच्या रुग्णांनी मात्र औषधाच्या वेळा कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे.
कन्या-: हा आठवडा फारसा आरोग्यदायी नाही. अचानक काही समस्या वाढण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. श्वसनाच्या आणि पचनाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. संबंधित त्रास जाणवल्यास तात्काळ उपचार सुरू करा.
वृश्चिक – : या आठवड्यात राशीतील ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. तीव्र दातदुखी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच डॉळ्यांचे आरोग्यदेखील जपा. सांधेदुखी अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान वाटत असलेल्या समस्यांकडेदेखील वेळीच लक्ष द्या.
धनू- : हा आठवडा आरोग्यदायी राहील. लहानसहान समस्या काहीशा त्रासदायक ठरतील. मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांना आरोग्यविषयक समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी अल्टरनेटीव्ह उपचारांची मदत घेणे फायदेशीर ठरेल.
मकर-: काही लहान आरोग्यविषयक समस्या या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मात्र त्या गंभीर होणार नाहीत. मात्र मध्यमवयीन आणि रक्तदाबाच्या रुग्णांनी वेळेवर औषधं घेणे आवश्यक आहे.
कुंभ – : अपघाताची या आठवड्यात दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहनं जपून चालवा. पित्ताचा त्रास या आठवड्यात दुर्लक्षित करू नका. त्यामुळे योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवा.
मीन -: सांधेदुखीचा त्रास,वेदना वाढण्याची या आठवड्यात दाट शक्यता आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधांसोबतच आहारात कॅल्शियमयुक्त आहाराचा समावेश करा. तसेच श्वसनाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. त्याबाबतही पुरेशी काळजी घ्या.