Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘सचिन –द फिल्म’–स्वप्नवेड्या मुलांना आणि पालकांना देणार खास संदेश !

$
0
0

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकर क्रिकेटच्या मैदानावरून निवृत्त झाला असला तरीही क्रिकेटपासून वेगळा होणे अशक्य आहे. आयपीएलच्या सामन्यांपासून ते लहान सहान सामन्यांपर्यंत सचिन भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी अनेकदा पॅव्हेलियनमध्ये सज्ज होतो. पण आता या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावरही उलगडणार आहे. नुकत्याच ‘सचिन-द फिल्म’  या चित्रपटाची पहिली झलक ऑफिशियल टीझरमधून सगळ्यांसमोर आली आहे.

सचिन खेळाडू म्हणून अष्टपैलू आहेच पण त्या सोबतच तो एक माणूस म्हणून उत्तम घडावा याकडे त्याच्या कुटूंबाचा आणि प्रामुख्याने वडीलांचा सतत प्रयत्न होता. आजकाल वेगाने वाढणारी स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारे यश-अपयश, मार्कांसाठी होणारी चढाओढ,नैराश्याचा खेळ यामुळे नकळत त्यांचे बालपण हिरावून घेत आहे.

सचिन हा केवळ खेळाडूंसाठी नाही तर ‘स्वप्न’ पाहणार्‍या आणि सचोटीने त्याचा पाठलाग करणार्‍या प्रत्येकासाठी आदर्श आहे . म्हणूनच मुलांना केवळ पुस्तकी किडा बनवण्याऐवजी उत्तम माणूस म्हणून घडवताना त्यांना या संस्कारांची शिदोरी द्या.

1) आदर करायला शिकवा -

समोरच्या व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्तरांवर पारखण्याऐवजी त्यांच्यातील चांगले -वाईट गुण हेरून त्यांच्याशी मैत्री करायला शिकवा. समोरच्या व्यक्तीचा आदर करायला शिकवा.

2) स्वावलंबी बनवा –  

आजकाल एकत्र कुटूंब पद्धतीत राहण्याचा, कुटुंबातील आपली जाबाबदारी ओळखून शिकण्याचा काळ सरला आहे. बंदिस्त वातावरणात आणि वेळेच्या अभावी पालक मुलांचे अतिलाड करतात. परिणामी त्यांना स्वतःची जबाबदारी घेण्याची पुरेशी संधी मिळत नाही.

3) मुलांवर करियर लादू नका -

अभ्यासात उत्तम गती असणे म्हणजेच करियर होणार हा पारंपारिक दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. मुलांना जे आवडते, ज्यामध्ये त्यांना गती आहे त्यात त्यांना 100% प्रयत्न करून त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवा. पालकांची अपूर्ण स्वप्न मुलांकरवी पूर्ण करण्याचा हट्ट करू नका.

4) इतरांसोबत सतत तुलना करू नका.

मुलांना त्यांचे प्रयत्न खुलेपणाने करू द्या. यामध्ये त्यांना मार्गदर्शन करताना आदर्श नक्की दाखवा. मात्र त्यांना मित्रांसोबत, भावडांसोबत सतत तुलना करणे टाळा. यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते.

पहा या चित्रपटाची पहिली झलक -:

छायाचित्र/ व्हिडीयो सौजन्य -: Carnival Pictures


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>