Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
शरीरात कोलेस्ट्रेरॉलची पातळी जितकी जास्त तितका हृदयविकाराचा धोका अधिक बळावतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणाईला कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे हे आव्हानच होऊन बसलयं. तणावग्रस्त जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांचा धोका वाढलाय. 2014 साली करण्यात आलेल्या संशोधनानुसार, 27% भारतीयांमध्ये कार्डीयोव्हस्क्युलर आजारांची शक्यता बॅड कोलेस्टेरॉलमुळे अधिक वाढते.
खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. पण आहारातील काही पदार्थांमुळे तुम्हांला त्यावर नियंत्रण मिळवणेदेखील शक्य होते. फळांमध्ये नैसर्गिक साखर् आणि अनेक पोषणद्रव्य असल्याने नियमित ऋतूमानानुसार फलाहार घ्यावा असा सल्ला दिला जातो. अननस हे एक असे फळ आहे, ज्यामुळे नैसर्गिकरित्या रक्तातील कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. याविषयी अमेरिकेत संशोधन करण्यात आले आहे. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ
मेडिकल सायन्स मॉनिटरच्या डिसेंबर 2005 साली प्रदर्शित करण्यात आलेल्या अहवालामध्ये सादर केलेल्या निष्कर्षानुसार, उंदरांना अननसाचा रस दिल्यानंतर त्यांच्यामधील लिपोप्रोटीन पार्टिकल्स कमी झाले. लिपो-प्रोटीनचा हृद्यविकार जडण्याशी थेट संबंध असतो. त्यामुळे जसा उंदरांवर सकारात्मक परिणाम झाला तसाच परिणाम मानवी शरीरावरदेखील होतो.
अननसामुळे नैसर्गिकरित्या कोलेस्टाईल नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच जर्मन संशोधकांच्यानुसारे लहान मुलांमधील सायनसची समस्या कमी करण्यासाठीदेखील मदत होते. त्यामुळे आता अननसाचा आस्वाद नक्की घ्या आणि स्वास्थ्य जपा.
Reference
1. Med Sci Monit. 2005 Dec;11(12):BR465-72. Epub 2005 Nov 24. Effect of acute and chronic grapefruit, orange, and pineapple juice intake on blood lipid profile in normolipidemic rat. Daher CF(1), Abou-Khalil J, Baroody GM.