PCOS हा महिलांमधील एक इन्डोक्राइन विकार असून त्यामुळे महिलांना वंधत्व येऊ शकते.प्रजनन काळातील ८ ते १० टक्के महिलांमध्ये पीसीओएस ही समस्या आढळते.ब-याचदा महिलांना पीसीओएस ही त्यांच्या वंधत्वा मागची मुळ समस्या आहे हे देखील समजत नाही.अनेक लोकांना असे वाटत असते की पीसीओएस ची समस्या असलेल्या महिलेला गर्भधारणा होणे कठीण असू शकते.खरेतर असे असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही कारण पीसीओएस या समस्येमुळे स्त्रीच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो.
जे हॉर्मोन्स स्त्रीमध्ये गर्भधारणेसाठी स्त्रीबीज निर्माण करणे व गर्भाशयाला तयार करण्याचे काम करीत असतात.Androgens (testosterone प्रमाणे असणारे एक मेल हॉर्मोन) या हॉर्मोनच्या अति वाढीमुळे व इन्सुलीनच्या पातळीत देखील झालेल्या अति वाढीमुळे स्त्रीच्या मासिक पाळीवर परिणाम होतो ज्यामुळे ओव्हूलेशन(अंडाशयामधून स्त्रीबीज सोडले जाणे) व्यवस्थित होत नाही.जाणून घ्याPCOS चा त्रास असणार्या स्त्रिया गरोदर राहू शकतात का ?
यासाठीच पीसीओएस समस्या असलेल्या महिलांनी गर्भधारणेसाठी प्रयत्न कसे करावेत हे जाणून घेऊयात गायनेकवर्ल्ड सेंटर फॉर वुमेन्स हेल्थ अॅन्ड फर्टिलिटीचे डायरेक्टर,दी पीसीओएस सोसायटी(इंडीया)चे फाउंडर प्रेसिडंट डॉ.दुरु शाह यांच्याकडून.
पीसीओएस ही समस्या असताना स्त्रीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यासाठी कोणते उपचार करावेत?
ब-याचदा वेट मेनेजमेंट मुळे गर्भधारणेमध्ये चांगली मदत होऊ शकते.हॉर्मोनल बदलांमुळे पीसीओएस समस्या असलेल्या अनेक महिलांचे वजन वाढते.यासाठीलठ्ठपणामुळे गर्भधारणेत अपयश येण्यामागील ५ कारणंं !जरुर वाचा.पण असले तरी अगदी ५ ते १० टक्के वजन कमी करुन देखील गर्भधारणा होण्याची शक्यता वाढू शकते.पण जर या उपायांचा फायदा न झाल्यास या दोन महत्वाच्या ट्रिटमेंट करुन तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करु शकता.
ओव्हूलेशनला प्रोत्साहन देणे-
गर्भधारणेसाठी ओव्हूलेशन होणे फार गरजेचे आहे व या उपचारांमध्ये त्या स्त्रीला ओव्हूलेशनसाठी प्रेरीत केले जाते.या उपचारांद्वारे वंधत्व अथवा ओव्हूलेशन समस्या असलेल्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये एक किंवा दोन मॅच्युअर्ड फॉलिकल्स(जिथे स्त्रीबीज विकसित होणे) विकसित करण्यासाठी उत्तेजन दिले जाते.संपुर्ण परिक्षण करुन डॉक्टर तुम्हाला काही ओरल अॅन्टी-एस्ट्रोजन औषधे घेण्याचा सल्ला देतात.उदा. Clomiphene किंवा Metformin, An Insulin sensitizer,या औषधांमुळे ओव्हुलेशनला चालना मिळते.
Clomiphene किंवा Metformin औषधे घेऊन देखील तुम्हाला गर्भधारणा न झाल्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला Gonadotropins —Follicle-Stimulating Hormone (FSH) व Luteinizing Hormone (LH) ही इंजेक्शन घेण्याचा सल्ला देतात. FSH व LH ही दोन्ही इंजेक्शन ओव्हूलेशनच्या प्रक्रियेसाठी मदत करतात. FSH मुळे ओव्हेरियन फॉलिकल्सला उत्तेजना मिळते ज्यामुळे स्त्रीबीजे वाढू लागतात तर LH मुळे स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर सोडण्यास मदत होते.तसेच तुमचे डॉक्टर तुम्हाला यासाठी कधीकधी Letrozole हे औषधोपचार देखील देऊ शकतात.तुमचे ओव्हूलेशन सुधारावे यासाठी केले जाणारे औषधोपचार फर्टिलिटी स्पेशलीस्ट कडूनच करणे गरजेचे आहे.जे तुमचे नियमित अल्ट्रासाउंड परिक्षण करुन तुमच्या फर्टिलिटी प्रोग्रेसवर नियंत्रण ठेऊ शकतात व ज्यामुळे इतर समस्या टाळण्यासाठी मदत होते.यासाठी जाणून घ्या यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!
आयव्हीएफ उपचार-
ज्या महिलांना पीसीओएस उपचारांचा फायदा होत नाही त्यांनी आयव्हीएफ (In Vitro Fertilisation) उपचार करावेत. हे उपचार ४० वर्षांच्या खालील वयाच्या स्त्रीसाठी असून ते तज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात येतात.आयव्हीएफ हा Assisted Reproductive Technology (ART) चा एक भाग असतो.इतर औषधोपचारांचा फायदा न झाल्यास असीस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करणे फायदेशीर ठरते.मात्र हे उपचार थोडे खर्चिक असतात.आत्तापर्यंत ज्या महिलांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल केले आहे अशा अनेक महिलांमध्ये हे उपचार यशस्वी ठरले आहेत.यासाठी IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणेसाठी काय कराल ? हे जरुर वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock