Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ताप गेल्यानंतर औषधे घेणे बंद करावे का ?

$
0
0

ताप आल्यावर आपण विचार न करता आपल्या मनाने गोळ्या घेतो आणि जर ताप १-२ दिवस गेला नाही तर डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर तापाच्या गोळ्यांबरोबर इतर औषधांचे डोस देतात. परंतु, एका डोस मध्ये ताप गेल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला औषधांचा कोर्स पूर्ण करावा की नाही, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण आपल्यापैकी अनेकजण तापाची औषधे पूर्णपणे घेत नाही. पण हे असे करणे योग्य आहे का? तापातून बाहेर पडण्याचे ’9′ घरगुती उपाय !

असो, पण ताप नसताना तापाच्या गोळ्या घ्यायला हव्यात का ? आपली ही शंका दूर करण्यासाठी आम्ही मुंबईच्या Consultant, Infectious Diseases आणि  Immunology डॉ. ओम श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया त्यांनी दिलेले उत्तर.

ताप येणे हे एक प्रकारचे इन्फेकशन आहे. म्हणून तो कमी करण्यासाठी औषधे घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य वेळी, योग्य औषधाचा डोस योग्य प्रमाणात घेतला तर ताप नियंत्रणात येतो. परंतु, काही वेळा ताप उतरल्यानंतरही डॉक्टर औषधांचा कोर्स पूर्ण करण्याचा सल्ला देतात. कारण लक्षणे दिसत नाहीत म्हणजे आजार नाही, असे नसते. ताप हे लक्षण असले तरी त्यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. म्हणून इन्फेकशन पूर्णपणे बरे होण्यासाठी औषधांचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे.  ताप वाढण्यामागील ही ’10′ कारणं तुम्हांला ठाऊक आहेत का ?

साधारणपणे ताप नसला तरी तापाची औषधे ५-७ दिवस घेण्याचा सल्ला दिला जातो आणि डॉक्टरांचा सल्ला पाळणे महत्त्वाचे आहे. जर ताप उतरल्यानंतर तुम्ही औषधं घेतली नाही तर बॅक्टरीयांचा प्रादुर्भाव (प्रतिकार) वाढण्याची शक्यता असते. अशावेळी जर पुन्हा तुम्हाला ताप आला तर त्याची गंभीरता वाढते. त्याचा त्रास अधिक होतो. आणि मग शरीराला इन्फेकशनशी सामना करण्यासाठी ७ ते १०-१५ दिवस अथवा ३ आठवडे वा १ महीना देखील लागू शकतात. म्हणून ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधांचा कोर्स पूर्ण करा. ही औषधे कधी आणि किती वेळा घ्यायची यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. साधारणपणे तापाची औषधे जेवणानंतर किंवा काही खाल्यानंतर दिवसातून तीनदा घ्यायची असतात. जर तुम्हाला पूर्णपणे बरे वाटत असेल आणि तुम्ही औषध घेणे बंद करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण स्वतःच्या मनाने औषधे घेणे, बंद करणे हे आरोग्यासाठी चांगले नाही. viral fever चा ताप किती दिवसात ठीक होतो ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>