Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डॉक्टरांचे स्पष्ट आणि जेनरिक औषधं लिहून देणं कसे ठरणार फायदेशीर ?

$
0
0

डॉक्टर रुग्णाला तपासतात व त्यांना योग्य अशा औषधांचे प्रिस्क्रीप्शन लिहून देतात.रुग्णांना काही औषधे प्रिस्क्रीप्शन शिवाय मेडीकलमधून खरेदी करता येऊ शकत नाहीत.मात्र डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन न  समजल्यास औषधांबाबत काहीवेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो जे फारच भयंकर असू शकते.तसेच  प्रिस्क्रीप्शन मध्ये दिलेल्या औषधांचे डोस किती प्रमाणात व किती वेळा घ्यायचे आहेत हे देखील रुग्णाला न समजू शकल्यास रुग्णाचा यामुळे प्राण देखील जाऊ शकतो.यासाठी जाणून घ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधे खरेदी करणे सुरक्षित आहे का ?

  • रुग्णांना याचा कसा फायदा होऊ शकतो?

ब-याच रुग्णांना ते घेत असलेल्या औषधांबाबत पुरेशी माहितीच नसते.नव्या नियमानूसार डॉक्टर औषधांचे प्रिस्क्रीप्शन कॅपिटल लेटर मध्ये तर लिहीणार आहेतच पण त्याच सोबत त्यांनी त्यात औषधांचे डोस व त्याबाबत सविस्तर माहिती देणे देखील आवश्यक आहे.यामुळे प्रिस्क्रीप्शनमध्ये होणा-या चुका कमी होतील व रुग्णाची सुरक्षा देखील राखता येईल.तसेच याचा डॉक्टरांना देखील तितकाच फायदा होईल.यामुळे डॉक्टरांचा वैद्यकीय निष्काळजीपणा टाळण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकेल.तसेच Expiry Date उलटून गेल्यानंतर गोळ्या घेतल्यास काय होईल ?हे देखील जरुर वाचा.

या निर्णयानूसार डॉक्टरांनी रुग्णांना औषधांच्या कार्यक्षमता व उपलब्धतेनूसार त्यांना परवडण्यासारख्या औषधांची जेनेरिक नावे लिहून द्यावीत.जेनेरिक औषधे ब्रॅन्डेड औषधांपेक्षा समान परिणामकारक असून स्वस्त व उत्तम दर्जाची असतात.मात्र असे असले तरी या औषधांची कमी प्रमाणात जाहिरात झाल्याने व मार्केटींग देखील होत नसल्याने अनेक डॉक्टरांना जेनेरिक औषधे माहितच नसतात.खरेतर डॉक्टरांनी रुग्णांला जेनेरिक औषधे घेण्याचा सल्ला दिल्याने रुग्णाचा वैद्यकीय खर्च कमी होतो व त्यामुळे सहाजिकच आजारपणात रुग्णांवरील औषधांच्या खर्चाचा अतिरिक्त बोजा देखील कमी होतो.त्यामुळे भविष्यात या निर्णयाचा अनेक रुग्णांना निश्चितच फायदा होईल. तसेच परदेशी फिरायला जाताना ही औषधे नक्की सोबत ठेवा!हे देखील अवश्य वाचा.

Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>